
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी परांडा -धनंजय गोफणे
परांडा:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयकुमार जैन व उपसभापतीपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच महविकास आघाडीचे नूतन संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड संदीप खोसे पाटील,कृउबा नूतन संचालक डॉ.रवींद्र जगताप शंकर जाधव, ॲड.सुजित देवकते, हरी नलवडे,दादा घोगरे ,सोमनाथ शिरसाट, हरिश्चंद्र उर्फ बापू मिस्कीन, सुदाम देशमुख, अनिकेत काशीद, किरण शिंदे, जावेद बागवान, सरचिटणीस घनश्याम शिंदे, राजेंद्र जाधव, तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, तालुका उपाध्यक्ष मा.सरपंच नागनाथ थोरात, तालुका सरचिटणीस युवराज सोनवणे, पिंपळवाडी – ब्रम्हगाव चे सरपंच भाऊसाहेब ओहाळ, तालुका उपाध्यक्ष कुंडलिक शिंदे , टाकळी चे सरपंच कृष्णा चौधरी, खासपुरी ग्रा. पं.सदस्य राजाभाऊ शिंदे,युवा नेते सलिम भाई हांनुरे, गनी भाई हावरे, ओबिसी नेते बिभिषण खुणे, राष्ट्रवादी अपंग संघटनेचे प्रदीप डोके,अमोल शेळके, रियाज पठाण, येणेगाव चे नेते बालाजी नाईकनवरे, श्रीपती सोनवणे, मनोज पिंपरकर, तानाजी ठवरे, भाऊ ओहाळ, सिध्दार्थ बनसोडे, अंकुश भोसले, अमोल जाधव, धनाजी जाधव, अरबाज बागवान, सर्जेराव लोकरे, हनुमंत सोनवणे, लखन चोबे, ऋषिकेश बनसोडे, कुणाल शिंदे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.