
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर खानापूर यादरम्यान लाकडी भुसा वाहून नेणाऱ्या टेम्पोने मोटरसायकल स्वारास समोरून जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (दि. ३) दुपारी खानापूर मुजळगा फाट्यादरम्यान घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो (एमएच २६ एडी ०३१२) लाकडी भुसा भरून देगलूरवरून नांदेडकडे जात होता. त्याचवेळी मोटरसायकलवरून (एमएच २६ बीएम ६०४०) नरसीहून महेश अशोकराव बाबरे (रा. बालाजी मंदिर, नरसी) हा युवकअशोकराव बाबरे (रा. बालाजी मंदिर, नरसी) हा युवक देगलूरकडे येत होता. त्यावेळी टेम्पोने जोराची धडक बसल्यामुळे महेश बाबरे जागीच ठार झाला.
मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने.
अपघातस्थळा वरून टेंपो चालक पसार झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. याप्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला