
दैनिक चालु वार्ता वडोद तांगडा प्रतिनिधी -समाधान कळम
भोकरदन, तालुक्यातील वडोद तांगडा येथे महावितरण कंपनीच्या रिडिंग कर्मचाऱ्यांनी चुकीचं रिडिंग टाकल्यामुळे विज ग्राहक,श्री बापूराव भागूबा तांगडे शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्या म्हतारे मायबापांना महिन्याला 200₹,310₹ बिल येत होते,बाजार गल्लीत सतत लाईटचा प्रश्न निर्माण होत असताना देखील ,श्री बापूराव तांगडे यांना महावितरणकडून चक्क 2350₹ बिल पाठविण्यात आलं आहे. विजबिल न भरल्यास तुमचा विजपुवठा खंडित करण्यात येईल हे बिल पाहून या शेतकरी मायबांपाला दरदरून घाम फुटला.
महावितरण आपल्या सेवेबाबत अनेक दावे करत असते मात्र अनेकदा चुकीचं बिल रिडींग व अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.महावितरणच्या या मनमानी कारभाराचा अनेकांना फटका बसला आहे. आता असाच प्रकार वडोद तांगडामध्ये समोर आला आहे.
महावितरण अधिकारी वायरमन अशोक सोनने यांना विचारपूस केली असता त्यांनी ग्राहकांनी विचारपूस केली असता ,त्यानी सांगितले की मी याला काहीच करू शकणार नाहीस आपणांस बिल भरावेच लागेल ,मी माझ्याकडून काही बिल कमी झाले तर करतो असं अश्वासन ग्राहकांना दिले.
वडोद तांगडा येथे कधी कधी आमवश्या पौर्णिमेलाच लाईट असते सदरिल गावात अनेक ठिकाणी स्वखर्चाने ग्राहकांनी सिंगल फेज 20 ते 30 गट्टे बसवले आहेत तरी, लाईट गेली असता संबंधित आधिकर्यांना फोन केल्यावर विचारणा केल्यास सतत परमिट घेतले आहेत असे सांगून ,ग्राहकांशी बोलण्यास नकार दिला जातो.
महावितरण कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांनी वडोद तांगडा या गावाकडे लक्ष देऊन ,लाईट बिल संदर्भात विचारपूस करावी आणि बिलं आरेच्या वारे पाठवू नये,अशी ग्राहकांच्या वतीने संबंधित अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त केली आहे.