
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना – जालना शहराची शान असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद रोडचे कार्य सुरु आहे. मात्र अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनची गरज आहे. जसे जालना मर्चंट बँक समोरच्या लाईनला पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. मात्र, बँकेच्या बाजुने पाईपलाईनच नाही. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या पाईपलाईनसाठी किंवा ऑप्टीक फायबर टाकण्याच्या नावाखाली अथवा ड्रेनेज लाईनसाठी सदर मार्ग पुन्हा खोदण्यात येऊ नये आणि तशी हमी पालिकेनेही द्यावी, अशी यांच्याकडुन मागणी ॲड. महेश धन्नावत यांनी केली आहे.
बडी सडक पुन्हा खोदल्या जाणार नाही यासाठी आत्तापासुनच प्रायोजन करावे. त्याचप्रमाणे ड्रेनेज प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच श्री चुन्नीलालजी भुरेवाल प्रवेशव्दारासमोर असलेले ड्रेनेज लाईन साफ करावे, असे अँड. धन्नावत यांनी म्हटले आहे. तसेच
जिल्हाधिकारी यांना विनंती की, नगर परिषद मुख्याधिकारी लेखी आश्वासन घ्यावे की, सदर मार्ग कमीत कमी दोन वर्ष तरी कोणत्याही कामासाठी परत खोदला जाणार नाही. लोकांनासुध्दा ॲड. धन्नावत यांनी आवाहन केले आहे की, नळकनेक्शन इत्यादी आधीच घेऊन टाकावे, नंतर रोड खोदने टाळावे, असेही ॲड. धन्नावत यांनी म्हटले आहे.