
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्ष पदी श्री रामराव दगडू लाठकर ( सोनसळे ) यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी असलेले व अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षासाठी रात्रंदिवस कामकरणारे, काँग्रेस पक्षासाठी स्वतःला झोकून घेणारे श्री रामराव लाठकर ( सोनसळे )यांच्या कार्याची दखल घेऊन दि.१२ जून २०२३ रोजी नांदेड येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्ष निवड करून निवड प्रमाण पत्र देण्यात आले.ही निवड सिद्धार्थ हतिअंबीरे ( प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, नांदेड जिल्ह्य़ाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री गोविंदराव शिंदे नागेलीकर,व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार सोमठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामराव लाठकर ( सोनसळे ) यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या वेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजीमंत्री डि.पी.सावंत,आमदार अमर राजूरकर,काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे ,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा काँग्रेस कमिटीचे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. नागोराव पाटील मोरे आलेगावकर , किशनराव पाटील लोंढे , उत्तमराव पाटील वडवळे कापसीकर यांच्या शिफारशीवरून ,व सतत पाठपुरावा मुळे
रामराव लाठकर ( सोनसळे ) यांची अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल माजी सभापती लक्ष्मीबाई घोरबांड , मा.सरपंच नागोराव डांगे , गावातील प्रथम नागरिक श्रीमती गयाबाई घोरबांड , उपसरपंच शेख बाशीदभाई , व्यंकटराव पाटील घोरबांड , नारायणराव डांगे , मा.उपसरपंच राहुल सोनसळे, सौ. रब्बाना कासीमशाह फकीर , कमलाकर शिंदे , सौ. संगिताबाई विजय भिसे , सौ. रेखा गंगाधर भिसे , गोविंद पोटजळे ,अंगुलीकुमार सोनसळे , अशोक काळम ,आमिनशा फकीर ,मोईनभाई शेख लाटकर , गोविंद भिसे , तुकाराम भिसे , प्रा.विजय भिसे , गंगाधर भिसे , जावेद मौलाना,मुखीद मौलाना, व्यंकटराव सोनटक्के ,राजू सोनटक्के ,नरेश शिंदे , अंकुश कांबळे ,संजय कांबळे , सलिम टेलर शेख ,परसराम भिसे , बालाजी घोरबांड , दत्ता पाटील घोरबांड ,म.शरीफ पिंजारी , मिथुन टेलर ,आयुब पठाण , यांच्या सह अनेक कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.