
दै.चालू वार्ता उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): आर्वी तालुक्यातील माटोडा(बेनोडा) येथील माजी सरपंच आनंद वंजारी (आठवले गट) यांना बौद्धजन हितकारणी सभा ट्रस्ट सम्यक क्रांति फाउंडेशन यांच्या विद्यमाने दी ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार २०२३ या पुरस्काराने कुमार रिसोर्ट मुंबई पुणे महामार्ग भगवान महावीर चौक,गवळी वाडा नाका लोणावळा पुणे येथील आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे आनंद वंजारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडी वर्धा जिल्हाध्यक्ष आहेत त्या अनुषगाने प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,माजी समाज कल्याण सभापती विजय आगलावे यांनी आनंद वंजारी यांचेवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे