
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.आकाश घोलप यांच्या नेतृत्वात,श्री.सचिन इंगळे यांची मानवहित लोकशाही पक्ष सोशल मीडिया अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितित तळागळापर्यंत समाजकार्यात अग्रेसर राहुन मानवतावादी विचार पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांपैकी सचिन इंगळे हे एक आहेत.मानवहित लोकशाही पक्षाचे काम व विचारसरणी हे जिल्ह्यातील घरा-घरात प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवीण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन सचिन इंगळे यांनी बोलताना केले.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.त्यांनी आपल्या निवडीबद्दल व संधि दिल्याबद्दल मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन साठे आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.आकाश घोलप यांचे आभार मानले.