
दिड महीन्यात विमा पॉलिसी काढण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन…
दै चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- खाजगी वाहन चालक यांच्या हातून आकस्मिकपणे अपघात झाल्यास त्याची चुक नसताना अज्ञात जमावाकडून अन्यायकारक वागणूक दिली जाते.तसेच खाजगी वाहनचालकांना तुटपुंज्या स्वरूपाचा पगार मिळतो. त्यावरच त्याचे व त्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह उपजिवीका चालते त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी शासनातर्फे खाजगी वाहनचालकाची विमा पॉलिसी काढण्यात यावी. कारण त्याची विमा पॉलिसी वाहन मालक काढत नाहीत तसेच त्याचे इन्शुरन्स काढत नाहीत.त्यामुळे त्याचे कुटुंबकुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे शासनाकडून खाजगी वाहनचालकाची विमा पॉलिसी काढण्यात यावी जेणेकरून त्याची व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा होऊन त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य होण्यास मदत होईल. अपघाताचे कारण जसे की गाडीचे तांत्रिक बिघाडामुळे अपघात वैगेरे होत असतात.अशावेळी स्थानिक लोकांकडून वाहन चालकांना मारहाण करण्याचे प्रकार हे नेहमी घडत असतात. त्यामुळे त्यांच्या जिवीताचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी खाजगी वाहनचालकना सुरक्षा देऊन शासनाने विमा पॉलिसी काढण्यात याव्यात अशी मागणी परमेश्वर भगवान ढगे, यज्ञकांत मारोती कोल्हे, गोविंद शिवाजी हंबर्डे, जगदीश नागोराव ससाने, नागोराव विठ्ठल घोडके, मारोती परसराम भोंग, ज्ञानेश्वर बालाजी ढेपे, विशाल विलाससिंह चंदेल यांनी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी दिड महीन्यात विमा पॉलिसी काढण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले आहे.