दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर : परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. संघीक गीत वसंत वाघमारे तर वैयक्तिक गीत तोटावार सुरेखा यांनी सादर केले. प्रमुख वक्ते म्हणून वै. धुंडामहाराज देगलूरकर महाविद्यालयांतील प्रा. डॉ. गंगाधरराव देशमुख हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिध्दार्थभाऊ आलूरकर हे होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना देशमुख यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ची माहिती देताना सांगितले की अखंड भारत ही आजची संकल्पना नसुन ती प्राचीन काळापासून भारतावरील परकीयाचे आक्रमणे झाली. त्या विरोधात निर्माण झालेली संकल्पना आहे. फाळणी ही भारतीयांना मान्य नसून ती भारतीयांवर लादल्या गेलेली आहे. अशाप्रकारे त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात बोलतांना सिद्धार्थभाऊ आलूरकर यांनी फाळणीच्या वेळेस असंख्य अशा भारतीयांनवर अन्याय अत्याचार करण्यात आला. हे सर्व पुढील पिढीस माहिती असावी यासाठी आपणास अखंड भारत संकल्पना पुर्ण करण्यासाठी आपल्याला देखील योगदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे असे सांगितले. तसेच सर्वमान्यवरानी अखंड भारताच्या नाकाशाचे पुजन केले. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘आठवी ब ‘ या तुकडीतील विद्यार्थी पवन संगमकर यांने केले तर आभार प्रदर्शन पांचारे रूपा यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मकरंद तम्मेवार यांनी सम्पूर्ण वंदे मातरम् ने केली.
