
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : भंडारज महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काळगव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानदेवराव ढवळे यांनी तहसीलदार मार्फत शासनाला केली आहे.
भंडारज महसूल मंडळातील काळगव्हाण,भुरसखेड,काटवेल,धुडकी या गावांमध्ये पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांची पिके सुकून कोलमडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.काही शेतकऱ्यांनी तर सावकारी कर्ज काढून पिकांची पेरणी केली.आता नैसर्गिक आपत्तीच्या ह्या कोपामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ पिक पाहणी करून त्यांना २५ टक्के पिक विम्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच ज्ञानदेवराव ढवळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामार्फत शासनाला केली.
काळगव्हाण ग्रामपंचायत येथे सरपंच सचिव सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत ठराव घेण्यात आला होता.त्याची प्रत तहसील कार्यालयाकडे सुद्धा देण्यात आली होती.त्या अनुषंगाने (दि.२२) मंगळवार रोजी सरपंचासह सदस्यांनी तहसील कार्यालयामार्फत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळी काळगव्हान ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानदेवराव ढवळे,मिलिंद पाटील निचळ,प्रदीपभाऊ सोनटक्के,प्रसाद पाटील निचळ,संदिपपाल महाराज,अभिषेक जांभुळकर,चंदू पाटील निचळ,शंकरराव दांदडे,राजू बगाडे,उद्धवराव निचळ इत्यादी शेतकरी उपस्थित होते.