ध्वनीक्षेपक यंत्रणा व विविध वस्तूंचे वाटप…
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजन…
दै.चालु वार्ता
चिखलदरा प्रतिनिधी
वासुदेव पाथरे
अमरावती (चिखलदरा) : चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मनभंग येथे स्वयंरोजगार कार्यशाळा संदर्भात झोनल ऑफिस बँक ऑफ महाराष्ट्र अमरावतीच्या वतीने व्यवस्थापक उमेश पराते यांनी ग्रामसभेत उपस्थितीत महिला युवक पुरुषांना स्वयंरोजगार संबंधात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने गदली सुसुन आदिवाशी नृत्याद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी चंद्रकांत पाटील उद्योजक बडनेरा यांच्यातर्फे जि.प.प्राथमिक शाळेला ध्वनी यंत्रणा व विविध वस्तू वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सं.गा.बा.वि.व्यवस्थापन परिषद सदस्य विद्याधर भैय्यासाहेब मेटकर हे होते.मार्गदर्शक म्हणून उमेश पराते,दत्ता हळवे,प्रभाकर रोहनकर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून निलेश दोड हे होते.विशेष उपस्थिती दीपक पडोळे,हरिश्चंद्र खुजे,सौ.निराटकर,सरपंच सचिन दहीकर,रामकिशन तोटे,रूपा दारसिंबे,शामलाल दहीकर,दयाराम दहीकर यांची होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पुथ्वीराजसिंग राजपुत,संचालन प्रा.धुर्वे आणि प्रा.मासोदकर,आभार प्रा.एकनाथ तट्टे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ.पृथ्वीराजसिंग राजपूत,डॉ.एकनाथ तट्टे,शिवा काळे तसेच स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आले होते.
