
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आठ सप्टेंबर रोजी जालन्यात..
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवने. जालना (मंठा ).
महाराष्ट्र शासन आपल्या दारी हे अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार जालना शहरात येत आहेत. या अभियानात जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह विविध खात्याचे मंत्री जालना जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासन स्तरावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्याला वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करत अभियानाचा लाभ घ्यावा कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लाभ मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील असून आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, व शिवसेनिकांनी आतापासूनच मंठा तालुक्यातील विविध भागातील गावातील गरीब व होतकरू तरुण यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. या कार्यक्रमासठी जास्तीत जास्त लाभार्थ्यासह शिवसैनिकांनी शेतकन्यांनी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन शिवसेना मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले..