
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी चिखलदरा प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) :चिखलदरा तालुक्यातील पल्स्या गावात शंभर घराच्या छोट्याश्या वस्तीत शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान महिलांनी कळस यात्रा काढली हे विशेष.त्यामुळे संपूर्ण गावाचे वातावरण शिवमय झाले होते.तर या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सौ.भुलाबाई किशोर मुंडे यांच्या स्वखर्चाने करण्यात आली असून भविकांकरिता महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करीत असताना उज्जैन चे पंडित देवा तिवारी राम शर्मा व सर्व पक्षीय पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाला कुठलाही भेदभाव न करता सर्वांनी आपले योगदान देऊन वातावरण प्रसन्नमय केले.तसेच या कार्यक्रमाला मजार्वणी व दहेंद्री गावातील भजन मंडळींचे सुद्धा योगदान यावेळी लाभले.