
दै.चालु वार्ताचे मुख्य संपादक डि. एस. लोखंडे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार):- उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तथा” दैनिक चालू वार्ताचे “पत्रकार लक्ष्मण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दै चालु वार्ता चे मुख्य संपादक डि. एस. लोखंडे यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विविध संघटना , सामाजिक कार्यकर्ते ,व पत्रकार संघाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करून दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उस्माननगर येथील पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचा ३० ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे , उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, विठ्ठल ताटे पाटील , बाजीराव पाटील कळकेकर ,लक्ष्मण भिसे , पोलीस पाटील विश्वाभंर मोरे , ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भिसे ,सम्यक कांबळे ,शाश्वत लोखंडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचा शाल, श्रीफळ ,हार ,पेढा ,केक ,चाॅकलेट यांच्या सान्निध्यात आभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला.पत्रकार लक्ष्मण कांबळे हे शांत,प्रेमळ,स्वभावातून नागरिकांशी मैत्री करून मोठा मित्रपरिवार तयार केला आहे.दै चालु वार्ता वृत्तमान पत्रातून जनसामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे धाडस केले आहे.लक्ष्मण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते ,शैक्षणिक क्षेत्रातील विद्वान,शिक्षक मित्र ,पत्रकार मित्र ,व्यापारी आणि विविध मान्यवरांनी तसेच आप्तेष्ट व सामान्य जनतेतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. .