
नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
राज्यात व देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे आज दि. २० डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजता लोहा शहरात येणार असून ते लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्नेह भोजनाला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कार्यालयांतून देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे आज दि.२० डिसेंबर रोजी हिंगोली लोकसभा २०२४ महाविजय अभियान अंतर्गत हिंगोली व नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून भाजपा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते यांना भेटून मार्गदर्शन करणार असुन दिवसभर ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन सायंकाळी ७.३० वाजता नांदेड ला येणार असून त्यानंतर ८.३० वाजता लोहा येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्नेह भोजन करुन भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कार्यालयांतून देण्यात आली आहे.