दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/भोकर :- व्हिपीके पतसंस्था शाखा भोकर च्या वतीने लगळुद ता भोकर येथील मयत शेतकरी कै गजानन माधवराव पाटील जाधव यांच्या कूंटुंबियाना पिठाची गिरणी मदत केली .व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष,तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लगळुद ता भोकर येथील कै.गजानन पाटील हा तरुण शेतकरी काढणी यंत्रामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन पर भेट देवून त्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना पिठाची गिरणी मदत केली.व्हिपिके पतसंस्था ही नांदेड जिल्हात कार्यरत असतांना ही संस्था आपला केवळ नफा न पाहता झालेल्या नफ्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते त्यांचाच एक भाग म्हणून आज लगळुद येथे केली मदत यावेळी किशोर पाटील लगळुदकर,भिमसिंग चव्हाण, सरपंच बंडु भंडारे, नागोराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष,रामा बागडे, जयवंतराव कदम, भुजंगराव कदम, गंगाराम ठाकुर, राजेश पाटील कदम, माधवराव पाटील जाधव,पिंन्टु पाटील कदम,सह विठ्ठलराव पाटील सुर्यवंशी, श्रीनिवास पाटील ढगे, जनसंपर्क अधिकारी उमाजी नादरे, भोकर शाखा व्यवस्थापक संजय शिंदे,मोमईवार सर सह लगळुद गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते…
