
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार ‘- लाडका ता.कंधार येथे दत्त मंदीराकडे जाणाऱ्या सि.सि.रस्त्याचे उद्घाटन व सभामंडपाचे भूमिपूजन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या व सामाजिक कार्यकर्त्या सो आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. दत्त मंदिर मंदिर लाडका येथे आरती करण्यात आली.दत्त भक्तांना पंगत होती या पंगतीमध्ये वाढपाचे काम आमदार साहेबांनी व सामाजिक कार्यकर्त्या सो आशाताई शिंदे ताईसाहेब यांनी केले. याप्रसंगी जिवनराव पा.पानपट्टे (जेष्ठ से.नि.अधिकारी सहकार विभाग) रोहीत पा.शिंदे कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, तानाजी पा.शिंदे सरपंच लाडका,मारोती पा.शिंदे, रावसाहेब पा.शिंदे, किशनराव पा.शिंदे, सचिन पा.शिंदे हाळदेकर,गंगाधर पा.पवळे चिखलीकर,सह गावकरी मंडळी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.