
दे.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर : – मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्यपत्रकार , दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येते ,याच पाश्र्वभूमीवर उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळा व समता मा.व.उच्च माध्यमिक विद्यालय येथे येथील ग्रामीण मराठी पत्रकारांचा शाल , श्रीफळ,पेन पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून पेन , पुष्पहार,शाल देऊन सन्मान करण्यात आला.व शाळेतील विद्यार्थ्यांचा पत्रकारांच्या हास्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दररोज शिकवलेल्या अभ्यासक्रमातून दर शनिवारी सर्व विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते.व सोमवारी सकाळी परिपाठ दरम्यान अनुक्रमांक काढून बक्षीस वितरण करण्यात येते.मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी.व स्पर्धा परीक्षा कशी द्यावी यांचे मार्गदर्शन दिले जाते.सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार केला.व विद्यार्थ्यांचा वही,पेन, म्हणून बक्षीस देण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी आपल्या मनोगतात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी व स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी मनोगत व्यक्त केले.
समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दर्पण दिनानिमित्ताने पेन,हार शाल देऊन सन्मान करण्यात आला.तर दाताळा येथील रहिवासी आणि नांदेड जिल्ह्यातील उद्योजक बाबुराव कसबे यांना “किस्ना” पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी गणेश लोखंडे, बाबुराव कसबे, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उस्माननगर येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सुर्यकांत माली पाटील,लक्ष्मण कांबळे,देविदास डांगे, राजीव अंबेकर,बाजीराव पाटील कळकेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक , कलाध्यापक राजीव अंबेकर यांनी केले तर आभार वाघमारे यांनी मानले.यावेळी शाळेतील विद्यार्थी , शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तसेच उस्माननगर येथील अरबिय मदरसा दारुल्लूम येथे दर्पण दिनानिमित्त पेन गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.यावेळी प्राचार्य मुजाहिद मौलाना, आमिनशहा फकीर , मशिदीतील मौलाना उपस्थित होते.
उद्योजक बाबुराव कसबे यांनी उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहाला प्रथम भेट दिल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी जिद्द चिकाटी आणि जिज्ञासू, मेहनत या गोष्टीचा अभ्यास करावा.यश निश्चित येते.पत्रकारामुळे मी आज मोठा झालो. त्यांचे प्रेम कधीही विसरणार नाही.असे मत व्यक्त केले.
पत्रकार सभागृहात जांभेकर यांना अभिवादन
उस्माननगर, मारतळा , शिराढोण येथील पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालाजी वैजाळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.