
दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :-समाजात,कुटुंबात या ना त्या कारणाने विविध कारणा
मुळे मतभेद तयार होतात.पुढे त्याचे रुपांतर भांडणात होते.मग त्याच्यापुढे जाऊन पोलीस स्टेशन,न्यायालयाच्या चकरा सुरू होतात. आर्थिक, मानसिक ताणाला सामोरे जावे लागते.हिच अडचण येऊ नये म्हणुन फिरते
न्यायालय आपल्या दारी आले आहे.आपसातील भांडण-तंटे मिटवणे हाच लोक न्यायालयाचा अंतीम
उद्देश आहे. असे प्रतिपादन सेवा निवृत न्यायाधिश मोहम्मद युनुस अब्दुल करिम शेख यांनी केले.ते कुरूळा येथील ग्रामपंचायत कार्यालय कुरूळा परिसरातील महात्मा फुले सभागृहात अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
९ जानेवारी २०२४ रोजी कंधार तालुका विधी सेवा समिती व अभियोक्ता संघ कंधार यांच्या विद्यमानाने ठेवलेले कायदेविषयक शिबिर,
फिरते/मोबाईल व्हेन लोकअदालत व कायदेविषयक साक्षरता शिबीराचे कामकाज पार पाडण्यासाठी पक्षकारांना याची माहिती देण्यात आली यावेळी ॲड.के.एस.अंन्सारी, डि.टी.देशमुख,टि.एस.बस्वदे,एन.आर.तेलंगे,विजय आडे,एस.आर.पवार , ॲड. मस्के,बन्सोडे
यांची यावेळी उपस्थीती होती.
पुढे बोलतांना न्या.शेख म्हणाले की,कौटुंबिक नात्यांमध्ये विविध प्रकारचे भांडणे होतात.वृद्धावस्था आली की,पालन पोषणावरूनही वाद होतात.यामुळेच संस्कृतीचे
माहेर घर म्हणुन ओळखणाऱ्या पुण्यामध्ये ६४ वृद्धाश्रम आहेत.महाराष्ट्रात १०८ वृद्धा श्रमांची संख्या आहे.यात जवळपास एक लाख लोक राहतात.हि चिंतेची
बाब आहे .असेही शेवटी ते म्हणाले. यावेळी ग्रामसेवक विलास कल्लाळे,मा.उपसरपंच शिवा चिवडे,ग्रा.स.प्र.
माणिक ढवळे,ग्रा.पं.चे सर्वच कर्मचारी,नागरिक,पक्षकार हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.एस.
अन्सारी यांनी केले,सुत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत
ढवळे यांनी केले तर आभार माणिक ढवळे
यांनी मानले.