पैठण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी…
दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक महिन्यासाठी लोकशाही वृत्त वाहिनी बंद करण्याचे आदेश काढल्याने पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवत पैठणचे तहसिलदार यांनी निवेदन देऊन बंदी तात्काळ उठवावी अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी पैठण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले. ही बंदी तत्काळ उठवावी अन्यथा पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, गौतम बनकर, रमेश शेळके, दादा गलांडे, सुरेश वायभट, शिवाजी गाडे, नंदू चव्हाण, एकनाथ काळे, मनोज खुटेकर, बाबा अडसूळ, तुषार नाटकर, गणेश पवार यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.