
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा – धाडस सामाजिक संघटनेच्या लोहा तालुकाध्यक्षपदी सोपनभाऊ बंडेवाड यांची धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गडमवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
धाडस हि एक सामाजिक संघटना असुन सामाजिक बांधिलकी , समविचार , देश हितार्थ व जनहितार्थ सत्य निष्ठेणे इमानदारीने , प्रामाणिक कार्य करून संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष सोपान बंडेवाड यांना या निवडी दरम्यान प्रतिक्रिया दिली.
सदरील निवडीबद्दल लोह्याचे धाडस सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपन बंडेवाड यांना सामाजिक , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.