
युवकांनी खासदारांना केली मागणी…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे.मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे.परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.शहरी तसेच ग्रामीण परिसरामध्ये नागरिक व्यायामापासून दूर जात आहे.काही खेळाडूंंना आवड असतानाही त्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध नसते.त्यामुळे नवयुवक स्वास्थ सशक्तीकरण करण्यासाठी आसरा माता देवस्थान व्यवस्थापन शहापूरा च्या वतीने खासदार नवनीत राणा यांच्याकडे व्यायाम शाळेच्या साहित्य करिता युवकांनी मागणी केली आहे.
देवस्थान व्यवस्थापन समितीची डिसेंबर २०२३ ला सदर विषयानुसार बैठक घेण्यात आली होती.आसरा माता देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन चऱ्हाटे,सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित असताना सर्वांनी व्यायाम शाळेला तर मान्यता दिली परंतु व्यायाम शाळेला लागणारे साहित्य महागडे असल्यामुळे सहकार्याची भूमिका खासदार नवनीत राणा यांच्याकडे निवेदन द्वारे येथील युवकांनी मांडली.
यावेळी खासदार नवनीत राणा यांना निवेदन देतांना आसरा माता देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन चऱ्हाटे,सचिव अभिजित चोरे व सदस्य उपस्थित होते.