
फळसप गावदेवी मातेचा यात्रोत्सव आणि १३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहित साजरा…
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – मुंबईच्या पुर्व पश्चिमेला अखंड सागरी समुद्र किनारा आहे तशाच प्रकारची नजाकात खास करून कोकणातील सिंधुदुर्ग,पश्चिम कोकणातील रत्नागिरी आणि उत्तर कोकणातील रायगडला समुद्र किनारे लाभले आहेत.कोकणात वेगवेगळया शहर,प्रांतातून येणारे पर्यटकांना इथल्या वातावरणाची आणि निसर्ग सौंदर्याची भुरळ घालते यात अधिक भर पडली आहे ती कोकणातील ग्रामस्थांनी गावाचे गावपण,गावाचे महात्म्य आबाधीत राखत कोकणी मन टिकवुन ठेवली असल्याचे मनोगत खासदार सुनिल तटकरे यांनी फळसप गावदेवी मातेचा यात्रोत्सव आणि १३ वा वर्धापन दिन सोहळा स्वागत कार्यक्रमात व्यक्त केले.कार्यक्रमाला दक्षिण मुंईतील खासदार मनोज कोटक,माजी आमदार शामभाई सावंत,आमदार अनिकेत तटकरे,विश्वस्त भास्कर दाजी विचारे,मनसे नेते शरद जाळगावकर,माजी सभापती महादेव पाटील,जीप माजी सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,अभिषेक विचारे,सिनेकलावंत कमलाकर सावंत,ऋतुजा गायकवाड,हास्य विनोद कलाकार दादुस,उद्योगपती कुणाल गाडा,सरपंच,उपसरपंच नाना विचारे,माजी जीप सदस्या वैशाली सावंत,व्यंकटेश सावंत,नाना सावंत,महेश घोले,किरण पालांडे आदी मान्यवर,ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार सुनिल तटकरे यांनी फळसप परिसराचे अध्यात्मिक महात्म्य विषद करताना श्री सोमजाई जाखमता सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट फळसप गावदेवी मातेचा यात्रोत्सव सोहळा प्रामुख्याने विश्वस्त दानशूर भास्कर दाजी विचारे,बापू विचारे यांच्या प्रेरणेतून आणि स्थानिक मुंबई निवासी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सातत्याने होत असतो.या कामी प्रमुख विश्वस्त दाजी विचारे सर्व राजकीय सहकाऱ्यांना निमंत्रीत करून निकोप मैत्री जोपासत गावाचा विकास करताना गावाचे ग्राम मंदीर भाविक भक्तगणसह पर्यटकांना आकर्षित करत प्रेरणा देणारे असावे याची दक्षता घेतली असल्याने दिवसेंदिवस फळसप गावाचे आध्यात्मिक महात्म्य वाढत चालले असल्याचे कौतुक खासदार सुनिल तटकरे यांनी केले.याच वेळी भाजप खासदार मनोज कोटक यांना कोकणातील रस्ते भावले मात्र मुंबई वरून प्रवास करताना त्यांना त्रासाचे झाले असल्याचे त्यांनी मनोगतात निदर्शनास आणून दिले असता त्यावर खासदार तटकरे यांनी भाष्य करताना कोकणचा विकास करण्यासाठी आमची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे.नव्याने आपल्याला महायुतीच्या माध्यमातुन देशाचा विकास करायचाआहे.देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपणांस एकत्रीत काम करायचे असल्याचे आवर्जुन सांगितले. आयोजीत कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांनी फळसप गावातील साकव बांधकाम उद्घाटन, बुद्धविहार बांधकाम आणि सुमारे दोन कोटी रुपयांचे प्रस्तावित तळाव शुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे हस्ते देवस्थान ट्रस्ट मार्फत दिनदर्शिका प्रकाशन,गावांतील उच्च शिक्षित विद्यार्थी ,माता पालक,यशस्वी उद्योगपती यांचा सत्कार आणि गाव परिसरातील प्राथमिक शाळेत शिकत असणाऱ्या गोर गरिब गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत येथे रूग्णसेवेसाठी ४ व्हील चेअरचे वाटप असा भरगच्च कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमांचे प्रस्ताविक ट्रस्टी विचारे यांनी तर सूत्रसंचालन कलावंत किरण खोत यांनी केले.