
शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प व पेढे भरून संकुलातील विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत…
दै.चालु वार्ता,
उदगीर,प्रतिनिधी अविनाश देवकते
उदगीर:येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल, प्राथमिक, इंग्रजी व मराठी, सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर( घुगे) यांच्या शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून या उपक्रमाला भरभरून प्रसिद्ध देत शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी एक मूल एक झाड अशी संकल्पना शाळेत राबवली आहे. इयत्ता पहिली व पाचवी वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा गुलाब पुष्प,पेढे भरून ढोल ताशाच्या गजरात सर्व शैक्षणिक संकुलातील गुरुजींनी स्वागत केले.स्वागतानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील एकंबेकर,विद्यावर्धिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम बांगे, पर्यवेक्षक राम ढगे, उप मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हनमंते, कलाशिक्षक एन. आर जवळे,परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील, बंडू पाटील लोणीकर,व्ही.एस कणसे, के.एम राजूरकर, मृदुला पाटील, नागनाथ गुट्टे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.व्ही बिरादार यांनी केले तर आभार अविनाशपोशेट्टी यांनी मानले.