
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे दि . १५ जूनरोजी संध्याकाळी झालेल्या तुफान पावसाने मेनलाईनचा विद्यूत पोल पडला . तारातील इलेक्ट्रीक करंट च्या शॉकमुळे दोन शेळ्या जागीच मृत पावल्या . सुदैवाने मानवी जीवहानी झाली नाही .
वृत्त असेही शनीवारी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस काजळेश्वर शिवारात झाला गावालगत असलेल्या विद्यूत मेन
लाईनचा पोल कोलमडला . लाईन सुरु असल्याने दोन शेळ्या ताराच्या स्पर्शाने शॉक लागून मृत पावल्या . शेळी पालक वसंत वाडकर व समाधान खडसे यांच्या शेळ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेळी पालक समाधान खडसे; वसंत वाडकर यांनी केली आहे .