
- दै. चालू वार्ता कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी कंधार नांदेड..
कुरळा परिसराला रविवारी दुपारी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यादरम्यान १० लाईटचे पोल व अनेक झाडे उकडून पडली आहेत.तर काही झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्यामुळे विद्युत ताराही तुटल्या आहेत त्यामुळे मरशिवणी अर्धेगाव,सोमठाणा,दैठणा,गुट्टेवाडी,पोखर्णी याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे .
सकाळ पासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी ४ वाजताच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि धो-धो पाऊस कोसळला. सोबतच सोसाट्याचा वारादेखील सुटला होता. दरम्यान जोरदार वादळी पावसाच्या तडाख्याने रस्त्या शेजारील झाडे उखडून पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्यामुळे.तारांसह विद्युत पोलही मोडुन पडले. काही भागांमध्ये वादळाने झाडे उन्मळून पडली आहेत. काही मिनिटेच आलेल्या वादळाने कहर केला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरशिवणी येथील समोरच्या बाजूला आसलेला पोल शाळेच्या संरक्षण भिंतीवर पडला आहे. कोणतीही जिवितहानी झाली नाही. झालेल्या वादळीवाळ्यामुळे दुपारपासून मरशिवणी अर्धेगाव, सोमठाणा, दैठणा, गुट्टेवाडी, पोखर्णी या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
याबाबत माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या वतीने तातडीने तारांवर पडलेली झाडे हटवून काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत चालू केला.व मरशिवणी अर्धेगाव, सोमठाणा, दैठणा, गुट्टेवाडी, पोखर्णी या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कंधार सत्यवान राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ तंत्रज्ञ एस.व्हि. जाधव,के.पी. फुलवळे विद्युत सहाय्यक एन.व्हि. कांबळे,सि.जी. नायगावे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे लाईट सुरळीत होण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत.