
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफचा युएसएमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिडलेला हारिस रौऊफ हा एका चाहत्याच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसत आहे.
विशेष म्हणजे हारिस रौऊफला हा चाहता इंडियन वाटला मात्र त्या चाहत्यानंच तो पाकिस्तानच असल्याचा खुसाला केला अन् हारिस रौऊफ तोंडघशी पडला.
यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधूनच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. दरम्यान, संघातील खेळाडू हे अजूनही युएसएमध्येच आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफ हा आपल्या पत्नीसोबत युएसएमध्ये भटकंती करत होता. त्यावेळी काही चाहते आणि हारिसमध्ये वाद झाला.
वाद इतक्या टोकोला गेला की हारिस त्या फॅनच्या अंगावरच धावून गेला. त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. हारिसच्या पायातील चप्पल निसटलं तरी तो त्या चाहत्याला मारण्यासाठी धावला होता. काही चाहत्यांनी रौऊफला रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी हारिसने हा भारतीय आहेस का असं विचारलं त्यावेळी त्या चाहत्यानं नाही पाकिस्तानचा आहे असं म्हणत हारिसला तोंडघशी पाडलं.
पाकिस्तानचे सहा खेळाडू हे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही युएसएमध्येच राहत आहेत. त्यात हारिस रौऊफचा देखील समावेश आहे.