
दैनिक चालु वार्ता
म्हसळा ( रायगड) प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – नुकत्याच संपन्न झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लाखों मतांचे फरकाने निवडून येऊ म्हणणारे आता पुन्हा गायब झाले आहेत ते दिसत नाहीत असा सणसणीत टोला आघाडीचे पराभूत उमेदवार अनंत गिते यांना मारताना मी घासून नाही तर ठासून निवडून आलो असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युतीचे मित्र पक्षाने आयोजीत आभार व स्वागत कार्यक्रमात मानोगत व्यक्त करताना सांगितले.शेकापच्या नेत्यांनी मतदारांना गृहीत धरून मतांचे आणि बेरजेचे राजकारण करत सातत्याने भूमिका बदलल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे असे सांगून शेकाप नेते जयंत पाटील यांचाही खरपुर समाचार घेतला.याच वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्लीत आमच ठरलय आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड मधील महायुतीचे सर्वच उमेदवार शंभर टक्के निवडून आणणार असल्याची ग्वाही दिली.लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ८२ हजार पेक्षा जास्त मतांची लीड देऊन मला विजयी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेसह भाजप,शिवसेना,मनसे, आरपीआय मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खासदार तटकरे यांनी आभार मानले.होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट केले.युतीचे सरकार मध्ये सत्तेत असलो तरी आम्ही आमचा धर्मनिरपेक्षपणा सोडला नाही. लोकसभा निवडणुकीत आघाडी पक्षांतील विरोधकांनी खोटे बोलुन जनतेची दिशाभूल केली त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाची घटलेल्या मतांची टक्केवारी पहाता खासदार तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.स्थानिक ठिकाणी बैठक घेऊन अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्याचा मी एकदा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करताना सारखे सारखे हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे सांगून चुकीला माफी नाही असे रोखठोक संकेत दिले. सन २०१९ ते २०२४ मध्ये खासदार म्हणून मी विरोधी पक्षात होतो आता मी सरकार पक्षाचा खासदार आहे सत्तेत असल्याने मागच्या पेक्षा अधिक गतीने विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करेल अशी ग्वाही देताना गाववाडी वस्तीत मंजुर करण्यात आलेली विकास कामे दर्जेदार करावीत अशा सूचना करतांना तक्रार झाल्यास सबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांची गय केली जाणार नाही अशी तंबी दिली.खासदार तटकरे यांनी ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील युतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करीत ८२,७८४ मतांची आघाडी घेऊन निवडून आणल्याचे समाधान व्यक्त करताना सर्वांचे जाहीर आभार मानले.म्हसळा घणसार हॉल येथे खासदार सुनिल तटकरे यांचा आयोजीत सत्कार व आभार सभेला राज्याच्या महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, भाजपचे नेते छोटमभाई,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती महादेव पाटील,नाझिम हसवारे,माजी सभापती बबन मनवे,डॉ.मुस्ताक मुकादम,उपनगरध्यक्ष संजय दिवेकर,सुनिल शेडगे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,अंकुश खड्स,शाहिद उकये,भाई बोरकर,लक्ष्मण भाये,भाई दफेदार,फैसल गीते,रियाज घराडे,
संदिप चाचले,मधुकर गायकर, नाना सावंत,अनिल बसवत,सतिश शिगवण
महीला प्रमुख छाया म्हात्रे,मिना टिंगरे, सोनल घोले,रेश्मा काणसे,हिरा बसवत,शगुप्ता जहांगीर,वृषाली घोसाळकर,भाजप महिला प्रमुख रेखा धारिया,अपर्णा ओक,जमीर नजीरी,शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले,भाजप अध्यक्ष तुकाराम पाटील,महेश पाटील, निलेश मेंदाडकर,प्रसन्ना निजामपुरकर,अमोल पेंढारी,नगर सेविका श्रीमती आमदानी, नौसिन चोगले,राखी करंबे,संतोष पाखड,सलीम बागकर,सुशिल यादव,बिलाल कौचाली,स्वप्निल चांदोरकर,दिपेश जाधव, भरत चव्हाण आदी युतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सभेत मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना मतदार संघात रखडलेल्या विकास कामांसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देत असताना काही राहीलेल्या त्रुटी असल्यास त्यात सुधरणा करून सर्वच प्रकारच्या कामांना गती देण्यासाठी आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी दर १५ दिवसांनी एसडीओ अमित शेडगे हे म्हसळा तहसील कार्यालयात उपलब्ध असतील असे आश्वासन दिले. खासदार सुनिल तटकरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी मोलाचे सहकार्य व योगदान दिल्याने जाहीर आभार मानले. सभेत मित्र पक्षाचे प्रमुख मान्यवरांनी खासदार सुनिल तटकरे यांचे मनोगतातून अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष समीर बनकर यांनी केले.