दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :महाराष्ट्र राज्यात वाढवण बंदर उभारणी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्वाची घटना असुन त्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
जगातील १० मोठ्या बंदरापैकी आपल्या देशातील महाराष्ट्र राज्यात हे एकमेव वाढवण हे एक मोठे बंदर असणार आहे.या प्रकल्पामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकासाला चालना मिळणार असुन खुप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुमारे १२ लाख रोजगार निर्मीती होईल अशी अपेक्षा आहे.
वाढवण परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना , मत्स्यव्यवसाय करणारे व या व्यवसायशी संबंधीत सर्व घटकांचे पुर्नवसन तसेच योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येवुन रोजगाराच्या नव-नवीन संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.
वाढवण बंदर हे जे.एन.पी.टी. व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतुन होणार आहे. या बंदर प्रकल्पाची किंमत ७६२०० कोटी इतकी आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे ७४ व २६ टक्के असा असणार आहे. अशी माहिती सोशल मीडिया द्वारे ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
