दैनिक चालू वार्ता उपसंपादक नागपूर
शंकर सालोडकर
नागपूर दीक्षाभूमी स्थित सुप्रसिद्ध डॉ.आंबेडकर महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता अकरावीत विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रथम पसंतीक्रम देऊन डॉ. आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली आहे. तसेच कित्येक विद्यार्थ्यांना आपला प्रवेश डॉ.आंबेडकर महाविद्यालयात होण्याची अति उत्सुकता लागली आहे. नागपूर मध्ये इयत्ता अकरावीसाठी असलेले केंद्रीय प्रवेश समिती
(द सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस) विज्ञान शाखेसाठी दि.27 जून 2024 पासून सुरू झाली आहे. नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा डॉ. आंबेडकर महाविद्यालयास विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दर्शविली आहे.
डॉ.आंबेडकर महाविद्यालयात विज्ञान शाखा 465 (93%) गुणांवर बंद झाली तर वाणिज्य शाखा 450 (90%) गुणांवर बंद झाली.
उपप्राचार्य
डॉ. कबीर रावळेकर