
दै चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड:-शनिवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा रोमांचकारी सामना होणार आहे.खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमरेकर यांच्या हस्ते प्रक्षेपणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. १९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात.आतापर्यंत पन्नास षटकांचे ७ वेळा आणि ट्वेंटी २० विश्वचषकाचे ८ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले.२००७ आणि २०११ मध्ये भारताने एक दिवसीय विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी २० विश्वचषक २००७ मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते. यावर्षीच्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघ जिंकेल असा विश्वास जगभरातील सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.सांय.७ वाजता उमरेकर हाइट्स शिवाजीनगर येथील तळमजल्या वर आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी केले आहे.