
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
आपत्तींमुळे होणारी हानी टाळण्यासाठी ;त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे.आपत्तींमुळे होणारी हानी टाळायची असेल, तर आपत्ती उद्भवायच्या अगोदरपासूनच आपत्तीचा अंदाज घेणे, प्रतिबंधात्मक उपाय योजणे, आपत्तीचे उपशमन आणि आपत्तीदरम्यान योग्य बचावासाठी कार्यवाही हाती घेणे इत्यादी गोष्टीचे नियोजन व व्यवस्थापन महत्त्वाचे असते . आपत्तीच्या काळात गोल्डन अवर समजून अपघात घटनेच्या ठिकाणी छायाचित्रे व व्हिडिओ काढत न बसता अपघातग्रस्तांचे प्राण वाचावेत असा गोल्डन अवर ओळखता आला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दि २७ जून रोजी आपत्ती व्यवस्थापण एकदिवशीय कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी नियोजन भवन वाशिम येथे केले.
याप्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, जिल्हा माहिती अधिकारी काझी,राष्ट्रीय प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.के.जयस्वाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचे सह स्वयंसेवी संस्थेचे तात्यासाहेब नवघरे,सुनील कल्ले,श्याम सवाई, गजानन मेसरे, प्रा.डोंगरे, अमोल काळे, आदित्य इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्य करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे श्याम सवाई, गजानन मेसरे, एनसीसीचे शिक्षक अमोल काळे व त्यांचा चमू तसेच एनडीआरएफचे अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविले.
आपत्तीत न घाबरता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पूणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या अधिकारी व त्यांच्या चमूने प्रात्यक्षिकातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनपर शिबीरात सीपीआर कसा द्यायचा, पूर परिस्थितीत नागरिकांना कसे सुरक्षित स्थळी पोहचायचे. प्राण कसे वाचवायचे,सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसे करावे. विषारी, निम विषारी, बिन विषारी साप कसा ओळखावा. लोकांचे प्राण कसे वाचवावे. सापाचे प्रकार किती आहे,रस्ते अपघात झाल्यास लोकांचे प्राण कसे वाचवावे. प्रथमोचार कसे करावे.,अग्निशमन यंत्र कसे हाताळावे. आग लागल्यास ती कशी विझवावी. घरगुती गॅस कसा हाताळावा., विजे पासून नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवावे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संचालन व उपस्थितांचे आभार शाहू भगत यांनी मानले.यशस्वितेसाठी अनिल घोडे नायब तहसीलदार, विनोद मारवाडी, मारोती खंडारे, श्रीकांत वडोदे, सुनील ठाकरे, तौकीर बेनीवाले, मुकींदा कांबळे, क्रिश बंगारे व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रशिक्षणाला स्वयंसेवी संस्था स्वयंसेवक,एनसीसी चे विद्यार्थी, जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी,विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.