
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : तुझी सेवा करीन मी मनोभावें वो । माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥नवसिये नवसिये माझे नवसीयेवो ॥ पंढरिचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥बापरखुमादेवीवरे विठ्ठले वो । चित्तीं चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥या अभंगाप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनी ठेवतच हजारो वैष्णवांच्या मेळ्याचे माउलींच्या
पालखी सोहळ्यासमवेत अनेक वारकऱ्यांचे वडगाव शेरी येथील सिद्ध मंदिरात आगमन झाले.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्यात आजचा ‘ डॉक्टर्स डे ‘ वडगाव शेरी, चंदननगर डॉक्टर्स असोसिएशनने सत्कारणी लावला. सिद्ध मंदिर वडगाव शेरी येथे वारकऱ्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक जन काळजी घेताना दिसला.
वारीमध्ये महिला, आबालवृद्ध, तरुण मुले, मुली प्रवास करत असताना आरोग्याच्या अनेक समस्या होत असतात. अशा प्रसंगी त्यांची काळजी घेणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो अशा भावना या वेळेस डॉक्टरांनी व्यक्त केल्या. दरवर्षी हा उपक्रम सातत्य ठेऊन राबविण्यात येत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. असे येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने सांगितले.या आयोजित कॅम्प मध्ये ५०० रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात आले. यासाठी असोसिएशनचे डॉ. गुंड सर, डॉ. इंदोरे सर, डॉ.धुणगाव, डॉ. दुगड सर, डॉ. भोसुरे सर, डॉ. पोखरणा सर, डॉ. जाजू मॅडम, डॉ. राका मॅडम, डॉ. भोसले मॅडम, डॉ. श्रुती मॅडम आदींनी विशेष सहकार्य केले.