
दैनिक चालु वार्ता
म्हसळा (रायगड )प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – प्रधानमंत्री पिक विमा योजना “महाराष्ट्र शासन कृषी विभाग ”
महाराष्ट्र शासन कृषी विभाग म्हसळा अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना ,फक्त एक रुपयात भात ,नाचणी या पिकाकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ई,पीक विमा उतरवता येणार आहे. करिता म्हसाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान” कृषी विभागाने” केले आहे “नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास” शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे ,दुष्काळ ,पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट होऊन क्षेत्र जलमय होणे ,वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व भात काढणीनंतर शेतात सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबी करिता विमा संरक्षण लाभ होणार आहे. खरीप हंगामामध्ये म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात भात व नाचणी या पिकांचा ई पीक विमा उतरवता येईल. शेतकरी एक रुपया वजा जाता राज्य शासनामार्फत उर्वरित विमा हप्ता भरण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपात आहे.कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीत सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
तालुक्यातील भात नाचणी पिका करीता अधिसूचित असलेल्या म्हसळा,खामगाव ,व मेंदडी या तीन महसूल मंडळामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे .रायगड जिल्ह्यामध्ये नियुक्त चोलामंडलम , क्रॉप इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत पिक विमा योजना राबविण्यात येणार आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टरी ५१,७६० जोखीम स्तर ,७० टक्के तर नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये,२०,०००/- प्रति हेक्टर जोखीम स्तर,७० टक्के इतका आहे ई,पीक पाहणी द्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी,ई पीक ॲप अंतर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. योजनेचे अंमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन ,स्मार्टफोन डिजिटल माहिती स्त्रोत अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येईल. विविध जोखीम अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनातील अटी व शर्तींच्या अधीन राहून केली जाईल .
खरीप हंगाम २०२४ करिता अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ अशी आहे पिक विमा साठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड ,पेरणी घोषणापत्र ,बँक खात्यांचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे पीक विमा पोर्टल ,पिक विमा कंपनी स्थळ ,बँक ,पीक विमा पोर्टल इत्यादी माध्यमाद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात .
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
ई पीकविमा योजने चे अर्ज भरताना बँकांमध्ये गर्दी न करता याकरता जन सेवा सुविधा केंद्रामार्फत सी.एस.सी सेंटर किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने पिक विमा अर्ज दाखल करण्यात येईल. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून देण्यात येईल. विमा कंपनी मार्फत टोल फ्री क्रमांक १८००२०८९२०० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदरील पिक विमा योजना योजनेच्या सविस्तर माहितीसाठी म्हसळा तालुका पिक विमा प्रतिनिधी श्री तुषार दवंडे, संपर्क करिता मोबाईल न.८७९६९५४२५५,ई-मेल आयडी- tushardav26@gmail.com तसेच अधिक माहिती करिता संबंधित गावाचे कृषी सहाय्यक,श्री. जि. पि. देवडे, (मुख्यालय आंबेत),, श्रीमती के . पि.शेळके, (मुख्यालय म्हसळा),,श्री. डी.पी सरनाईक (मुख्यालय काळसुरी),श्री ए. एम. सानप कृषी सेवक पाभरे,व श्री एस.एन कुसळकर कृषी पर्यवेक्षक,म्हसळा,-, श्री आर.बी. मगर म्हसळा,२ , आणि तालुक्याचे मंडल कृषीअधिकारी , श्री आर .ए. ढंगारे