
भास्करराव पेरे पाटील यांची विशेष उपस्थिती
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील होतकरू तरुणांनी एकत्र येत बिगर राजकीय सदभावना प्रतिष्ठान तयार केले असून या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. याचाच भाग म्हणून सदभावनांची उधळण करत भाऊबीजेला दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी यूपीएससी, एमपीएससी, डॉक्टर, सेट नेट उत्तीर्ण झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पाटोदा आदर्श गावचे प्रणेते भास्करराव पेरे पाटील, न्या. सुनिल भोसले, नेवासा, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उदगीर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सामाजिक जान अन भान असलेले व गाव मातीशी नाळ जोडून असलेल्या तरुणांनी एक चांगली भूमिका घेत गावचे ऋण फेडण्यासाठी पुढाकार घेत आहेत. प्रतिष्ठानच्या पहिल्याच बैठकीत गावातील यूपीएससी, एमपीएससी, डॉक्टर, सेट-नेट उत्तीर्ण झालेल्या भूमिपुत्रांचा सन्मान करण्याची भूमिका घेण्यात आली. या भूमिकेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. यासाठीचा मुहूर्त ठरला भाऊबीजेचा. नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी बाहेरगावी राहणारे अनेक जण भाऊबीजेला गावाकडे येतात. म्हणून हा दिवस ठरविण्यात आला. या सत्कारातून गावातील लहान मुलांनी प्रेरणा घेऊन उच्च शिक्षण घेऊन मोठेअधिकारी बनावे, ही भूमिका प्रतिष्ठानची आहे. तरी या सोहळ्यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या भूमिपुत्रांचा होणार सन्मान:
व्यंकटेश गंगाधर शेवाळे (बी. टेक यूपीएससी, आयएफएस), विकास शिवराज जाधव (एम. एस.सी. एमपीएससी एस.टी.आय.), रोहन देविदास जाधव( बी. ई. मेकॅनिक आरसीएफ), डॉ. व्यंकट प्रल्हादराव पाटील (एम. ई. पीएचडी), डॉ. दयानंद रामराव माने( एम. ए. इंग्लिश पीएचडी),
डॉ. शांतीसागर किशनराव बिरादार एम. ई. पीएचडी), डॉ.विद्यासागर किशनराव बिरादार( एम.एस.सी. ऑग्री, पीएचडी), डॉ. तानाजी कामाजी उदगीरकर एम. ए. पीएचडी), डॉ. मनीषा प्रकाश भारती (एम. ई. पीएचडी), डॉ. बालाजी मधुकर एकुर्केकर( एम. ए. अर्थशास्त्र, पीएचडी), डॉ. राजेश दत्तात्रय भारती (एम. टेक. पीएचडी), संजय हनुमंतराव ऐलवाड ( एम. ए. एम. जे. साहित्यिक), डॉ. हर्षवर्धन विजय पाटील( एम. डी. मेडिशिन), डॉ. रजनी तातेराव कांबळे( बीएमएस पीजी कॉस्मो.),
डॉ. नमिता तातेराव कांबळे (एम.डी.), डॉ. जयदीप सुरेश जाधव( एमडी पर्सुइंग), एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेले
ऋषभ संजय जाधव, शोएब मौलासाब पठाण,अखिब मौलासाब पठाण, डॉ. शुभम किशन शेवाळे, श्रीशैलेश किशन शेवाळे, कुणाल सुरेश भारती, कोमल शिवाजी काकडे (बीएमएस), विशाखा गंगाधर शेवाळे-भानवसे (एमएससी मायक्रोटेके, नेट-सेट जीआरएफ, शास्त्रज्ञ), अंजुम रसूल पठाण एमएससी रसायनशास्त्र, सेट), समर्थ विद्यालय(
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान जिल्ह्यात तृतीय), शितल उत्तम जाधव (१२ वी विज्ञा शाखेत प्रथम), रेणुका हनुमंत गादीमोड १२ वी कला शाखेत प्रथम), सरस्वती निळकंठ शेवाळे( १० वी वर्गात प्रथम)