
पुणे:लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये दिले जातील. या योजनेला राज्यातील विरोधकांनी विरोध सुरूच ठेवला. कोर्टानेही त्यांना आरसा दाखवला. एकीकडे लाडली बहीण योजनेला विरोध केला जात आहे.
दुसरीकडे, विरोधक आपल्या उपक्रमात महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये देण्याची चर्चा करतात. हा विरोधाभास आहे. तर पाठीमागील महाविकास आघाडी सरकार हे हफ्ता वसुली करणारे सरकार होते, असा आरोप पवनी येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे सर्वसामान्यांचे सरकार आहे. दहा हजार तरुणांना भत्ता दिला जात आहे. आमच्या सरकाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले, काँग्रेसने इतर राज्यात योजना जाहीर केल्या. नागरिकांना लाभ देण्याचे आश्वासन दिले. पण ज्यावेळी लाभ देण्याची वेळ आली त्यावेळी नंतर त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारने योजनांमध्ये स्पीड ब्रेकर लावल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
राहुल गांधींचे नाव न घेता पवनी येथील प्रचार सभेत शिंदे म्हणाले की, दिल्लीचा ‘फुसकी फटाका ‘ राज्यात परतला आहे. पंचसूत्रीच्या नावाने काही मोहक आश्वासने दिली. मात्र हे सर्व मागे पडून २३ तारखेला जनतेचे सरकार स्थापन होणार आहे.