
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
पिंपरी…राज्याचे उपमुख्यमंत्री तथा
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत बनसोडे यांचा पानटपरीचालक, नगरसेवक ते आमदार हा राजकीय प्रवास प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे.
बनसोडे हे निस्वार्थ भावनेने नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडाडीने झटणारा कार्यकर्ता असल्याचेही अजित पवार म्हणाले. कोरोना महामारीसारख्या संकटात बनसोडे यांनी राज्य
सरकारचा
धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याआधीच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना कोरोना प्रतिरोधक लस मिळाव्यात, यासाठी आपल्या निधीतून २५ लाख रुपये देऊ केल्याची आठवणीलादेखील अजित पवार यांनी उजाळा दिला. तर, अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक विकासकामे केल्याचेही या वेळी अजित पवार म्हणाले.