
मुंबईतील बीकेसीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत कोणता निर्णय घेणार, हे त्यांनी जाहीर केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमची सत्ता आली तर मी मुख्यमंत्री होईल ना होईल पण मंत्रिमंडाळाच्या पहिल्याच बैठकीत अदानीच्या घशातून काढून घेण्यााच निर्णय घेईल. अदानीला देण्यात आलेले सर्व प्रकल्प मी काढून घेणार आहे.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करत आहेत. पण हे होऊ शकणार नाही कारण आधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगून ठेवले आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार जरी केला तरी देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर नीती आयोगाकडून मुंबईची ब्ल्यु प्रिंट बनवणत तोडण्याच्या प्रयत्न हे सरकार करत आहे, असे ठाकरे म्हणाले .
आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे
मोदी पंतप्रधान असताना जर सुरक्षित वाटत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा . हे कटेंग आणि बटेंगेच्या घोषणा देतायेत. सत्ता येईपर्यंत सबका साथ सबका विकास आणि सत्तेत आल्यावर कटेंग तो बटेंगे. आमचं हिंदुत्व हे दुसऱ्यांचे घर पेटवणारे नाही. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंकजा मुंडे यांचे मानले आभार
पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेत भाजपचे काम भारी असल्याचे म्हटले होते. भाजपने बूथवर काम करण्यासाठी बाहेरून 90 हजार माणसं आणल्याचे म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे आभार मानले. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली.