
भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल, असे सांगितले जात आहे.
4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटचीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या सॅटेलाइटचे मिशन लाइफ 14 वर्षांचे आहे. यासंदर्भात ISRO चे प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली. लॉन्चिंग दरम्यान ते म्हणाले, “GSAT 20 चे मिशन लाइफ 14 वर्षं एवढे आहे आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा सॅटेलाइटच्या मदतीसाठी तयार आहे.”