
विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलं आणि आता सरकार कुणाचं बनणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही एक्झिट पोलने तर स्पष्टपणे महायुतीचं सरकार येणार असं सांगितलं आहे. तरी काही एक्झिट पोलने मविआचं सरकार येणार असं सांगितलं आहे.
मुळात लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच एक्झिट पोल साफ चुकले होते. त्यामुळे काही एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा सुरत गुवाहाटीचे संकेत मिळत आहे.
जवळपास 8 ते 10 एक्झिट पोलमधून महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार याबद्दल अंदाज वर्तवले आहे. लोकशाही रुद्रने आपल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १२८ ते १४२ जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२५ ते १४० जागांचा अंदाज वर्तवला आहे. या ठिकाणी दोन्ही गटाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तर कमी जागा झाल्या तर घोडेबाजार होणार हे अटळ आहे. किंवा अपक्ष आणि बंडखोरांची मदत घ्यावी लागणार आहे.
भास्कर रिपोर्टर्स पोलमध्येही महायुतीला १२५ ते १४० जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १३५ ते १५० जागांचा अंदाज वर्तवला आहे.
तर, झी न्यूज ICPL च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १२४ ते १५६ जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२९ ते १५९ जागांचा अंदाज वर्तवला आहे.
जवळपास इतरही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला कमी जास्त जागा दिल्या आहेत. त्यामुळे कुणाला जर बहुमत मिळालं नाही तर राज्यात घोडेबाजार, आमदारांना पळवापळवीचा खेळ रंगणार अशी शक्यता नाकारता येत नाही.