
जगामधलं सगळ्यात पवित्र नातं कोणतं? असं विचारलं तर अनेक जण आई-मुलगा, वडील-मुलगी आणि बहीण-भाऊ असं उत्तर देतील, पण अनेकवेळा नात्यांबद्दल अशा गोष्टी ऐकायला मिळतात, ज्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते.
कधी एखादा भाऊच त्याच्या बहिणीवर अत्याचार करतो तर काका पुतणीचं शोषण करतो, पण परस्पर संमतीने लग्न करायचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगी जी उत्तरं देत आहे ते पाहून अनेकांनी तिला निर्लज्ज असंच संबोधलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगी आपण वडिलांशी लग्न केल्याचा दावा करत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीला तुम्ही दोघं कोण आहात? असं विचारण्यात आलं, तेव्हा मुलीने क्षणाचाही विलंब न लावता हे माझे वडील आहेत असं उत्तर दिलं. लग्न करून आम्ही खुश आहोत, हे आम्ही जगाला दाखवलं आहे, असंही मुलगी व्हिडिओमध्ये म्हणत आहे. आमच्या नात्याला कुणाचाही पाठिंबा नव्हता, पण आम्ही लग्न केलं. आता आम्हाला कुणी पाठिंबा दिला नाही तरी फरक पडत नाही, असं मुलगी व्हिडिओमध्ये म्हणत आहे.
वडिलांनाही ही तुमची मुलगी आहे का? हे विचारलं तेव्हा त्यांनीही हो, यात अडचण काय आहे? असं उत्तर दिलं. यानंतर एका महिलेने तुला वडिलांसोबत लग्न करताना जराही लाज वाटली नाही का? असा प्रश्न विचारला. यावर अरे यार, तुम्ही कोणत्या जमान्यात राहत आहात? असं प्रतिप्रश्न वडिलांनी केला. या व्हिडिओमध्ये मुलगी स्वत:ला 24 वर्षांची असल्याचं सांगत आहे, तर वडील 50 वर्षांचे आहेत. लग्नाचा व्हिडिओ बनवण्याचं कारण विचारलं असता आम्हाला जग बदलायचं आहे, असं उत्तर मुलीने दिलं.
आमच्या नात्याबाबत लोक पाठीमागून बोलतात, त्यामुळे आम्हाला अशा लोकांना व्हिडिओ बनवून आमच्या नात्याबाबत सांगायचं आहे. हे लग्न आमच्याबद्दल उलटसुलट बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर आहे, असंही ही मुलगी म्हणाली आहे. पती-पत्नी म्हणून राहायचा प्रश्न विचारला असता, साडीपासून सिंदूरपर्यंत सगळं लावलं आहे, तरी तुम्हाला समजत नाही का? बेकार प्रश्न का विचारत आहात? असं म्हणत ही मुलगी संतापली.
ही मुलगी नेमकी कोण आहे? तिचे वडील कोण आहेत? याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण जय सिंह यादव नावाच्या यूजरने एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही क्लिप टिकटॉकची असल्यामुळे हा प्रकार 2020 किंवा त्याआधीचा असण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे का, खरंच या दोघांनी लग्न केलं? याची पुष्टी चालु वार्ता करत नाही. पण हा व्हिडिओ मनोरंजनासाठी जरी केला असला तरी बाप-मुलीच्या नात्याला बदनाम करणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.