
विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मनसेच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. . मात्र, त्याच दरम्यान मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं.
पालघर मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क मारहणीत झालं असल्याचं समोर आलं आहे हा वाद इतका वाढला की, चक्क कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला आहे . पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर 15 ते 20 मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जातोय.
तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
आज दुपारच्या सुमारास अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते , तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंतर्गत वादाचा रूपांतरण थेट रुपांतर हल्ल्यात
सध्या बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे . मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा रूपांतरण थेट जीवघेणा हल्ल्यापर्यंत गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
अविनाश जाधवांचा दुपारी तडकाफडकी राजीनामा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे (MNS) ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना (Avinash Jadhav Resign) राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. अविनाश जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे.