
ढगाळ वातावरणामुळे पिंकाचे नुकसान होण्याची शक्यता
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
ढगाळ वातावरणात बदल झाला आहे यामुळे पावसाचे संकेत निर्माण झाला असुन या ढगाळ वातावरणामुळे पिंकाचे परिणाम होतो
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी (दि.३०) सायंकाळी आदळले. याचा परिणाम दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश, केरळ राज्यांत अधिक दिसून आला. ‘फेंगल’ चक्रीवादळ शांत झाले असले तरी, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर याचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, आजपासून (दि.२) शुक्रवारपर्यंत (दि.६) राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड परभणी हिंगोली वाशिम, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.