
अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या सिनेमामुळे चर्चेत होती. प्राजक्ता सध्या देवदर्शन करत आहे. तिने नुकतेच उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. दरम्यान प्राजक्ता माळी महिला आयोगात धाव घेणार आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार आहे. बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणानंतर प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे जात तक्रार करणार आहे. आज पत्रकार परिषद घेत प्राजक्ता माळी सर्वांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा, अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
भावाच्या लग्नात सुचली बिझनेसची आयडिया, वर्षभरात मालामाल, प्राजक्ताच्या फार्महाऊसचं 1 दिवसाचं भाडं किती..?
सुरेश धस यांनी केलेल्या टीकेवर प्राजक्ता माळी महिला आयोगात जाणार आहे. त्यानंतर नेमकं काय होणार? प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, तिचा फुलवंती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्राजक्ताने या सिनेमाच्या माध्यमातून निर्माती म्हणून पदार्पण केलं. सिनेमाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांनी सिनेमाला पसंती दिली. थिएटर रिलीजच्या 50 दिवसांनी फुलवंती हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. तिथेही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
प्राजक्ता माळी अभिनयाबरोबरच तिचा प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँड चालवतेय. त्याचबरोबर प्राजक्ताने कर्जत येत एक फार्महाऊस खरेदी केलं. ज्याचं नाव प्राजक्तकुंज असं आहे. फार्महाऊसच्या माध्यमातूनही प्राजक्ता चांगली कमाई करतेय.