बीडच्या आरोपींचा मर्डर झालाय, मृतदेह…
राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणाचे आरोपी 19 दिवस झाले तरी अटक झाले नाहीत. उर्वरित आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघत आहे.
अंजली दमानिया यांनीसुद्धा हे प्रकरण लाऊन धरलं आहे. शुक्रवारी रात्री त्यांना एक फोन आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. त्या फोनमध्ये सदरील व्यक्तीने उर्वरित तिनही आरोपींचा खून झाल्याची सांगितलं. त्या आरोपींचे मृतदेह नेमके कुठे आहेत, हेदेखील त्यांना अनोळखी इसमाने सांगितलं.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया म्हणाल्या की, रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजता मला एक फोन आला. अनोळखी इसमाने आधी मला व्हॉट्सअप कॉल केले. परंतु कॉल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला व्हाईस मेसेज टाकले. त्यात त्यांनी इतर तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याचं सांगितलं. आता हे आरोपी पोलिसांना सापडणारच नाही.
दमानिया पुढे म्हणाल्या, आरोपींचे मर्डर झाल्याचं ऐकून ही हबकलेच. मी ही माहिती पोलिस अधीक्षकांना दिली आहे. सात आरोपींपैकी तिघांची हत्या झाल्याचं मला सांगण्यात आलेलं असून ती प्रेतं नेमकी कुठे आहेत, याची जागासुद्धा सांगितली आहे. हे खरं की खोटं, हे मला माहिती नाही.
या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करुन धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
