राजापूरातील तुळसुंदे मधील प्रकार,नाव सांगितल्यास जीवे मारण्याची आरोपीची पीडित मुलीला धमकी..!
प्रकरणात निष्पाप ११ वार्षीय मुलाला गोवण्याचा प्रयत्न
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर : -( तुळसुंदे ) राजापुरात एका ९ वर्षीय बालिकेवर तरुणाने लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांच्या कानावर घातला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी या अत्याचारप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व ‘पोक्सो’ अंतर्गत कलम ४,६,८,आणि १२ कायद्यानुसार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ६ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पारस भिकाजी आडिवरेकर ( वय २१, रा.तुळसुंदे राजापूर) असे या प्रकरणातील आरोपी च नाव आहे. शुक्रवारी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, त्याला १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी याने पीडित ९ वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या नंतर पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये संशयित आरोपीने अत्याचार केला असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ६४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.
◆ *पिडीत मुलीला न्याय मिळवून देणारा…*.. ◆ अश्वनाथ खेडकर -पोलीस निरीक्षक नाटे
