दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :
लातूर पोलीस प्रशासनाचे नवीन वर्षाच्या निमित्ताने जनतेला आवाहन…
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशानुसार उदगीर ग्रामीण चे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी उदगीर आणि परिसरातील नागरिकांना विशेषत: आवाहन करत म्हटले आहे की, नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करावे, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून.
पोलीस प्रशासनाने उदगीर नाका, कॅप्टन चौक आणि बिदर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावली आहे. बेकायदेशीर द्रव्ये आणि वाहनचालकांच्या दंडात्मक कारवायांवर भर देण्यात येणार आहे. उदगीर ग्रामीण चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी स्पष्ट केले आहे की, वरिष्ठांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बळ रस्त्यावर तैनात राहणार आहे.
नागरिकांना आवाहन करत राजकुमार पुजारी म्हणाले, “आपण नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करू शकता, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून. दारू पिऊन वाहन चालवणे, बेकायदेशीर द्रव्ये बाळगणे अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींना बळी पडू नका. आपण स्वतःचे तसेच इतरांचेही जीवन धोक्यात आणू नका.”
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अपील केले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
