
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहिल. आज काही पोरा टोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. बघा त्यांचे चेहरे. ही प्यादी आहेत लहान, ही भाडोत्री पोरं आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटले आता. त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत.
खऱ्या अशाप्रकारे राज्य करणे हे अमित शाहांना मी सांगू इच्छितो, तुम्ही गृहमंत्री आहात आला होतात ना, तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहित नाहीत. हे राज्य चालवणे अशाप्रकारे ते ही गुंडांच्या मदतीने हीच या राज्याशी गद्दारी आणि बेईमानी आहे. असे संजय राऊत म्हणाले.