दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
आळंदी दि. १७ गेली दोन-तीन वर्षांपासून आळंदी ते वाघोली ही बस सेवा सुरू होती, मरकळ येथील इंद्रायणी नदीवर असणारा पूल खचल्याचे कारण पुढे करीत सदरची बस सेवा बंद करण्यात आली होती, तदनंतर बाजूलाच नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते तीन वर्षे झाले तरी अजून पुलाचे काम संत गतीने सुरू आहे, त्यामुळे जुन्या पुलावरून जड बंदी असल्याने पी एम पी एम एल च्या आळंदी ते वाघोली या बस सेवेमध्ये दोन पर्याय ठेवले होते. आळंदी ते मरकळ पूल व इंद्रायणी नदीच्या पलीकडे तुळापूर ते वाघोली अशी बस सेवा सुरू होती. मात्र प्रवाशांना रात्री अपरात्री पुलावरून पायी ये जा करावी लागत होती. सुरुवातीला सदरील पुलावर जड वाहनास बंदी घालण्यात आली होती. मात्र काही कालांतराने या पुलावरून जड वाहने जाण्यास सुरुवात झाली, तरी देखील आळंदी ते वाघोली बस सेवेला सार्वजनिक बांधकाम विभाग(पीडब्ल्यूडी) खात्याकडून जुना पूल वापरास योग्य आहे ?की नाही? याचा दाखला मिळत नव्हता, त्यामुळे जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नव्हते, परंतु शिरूर तालुक्याचे आमदार यांनी पुढाकार घेऊन गेल्या आठ दिवसांपासून सदरील बस सेवा पूर्वत करून आळंदी ते वाघोली दर अर्ध्या तासाला बस सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, आबाल वृद्ध, यात्रेकरू भाविक भक्त, तसेच नगर रोड वरून पुढे बीड, औरंगाबाद,रांजणगाव, शिक्रापूर, व मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांना हा मार्ग सोयीचा होता त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने भरून जात येत होत्या, तरी गेली आठ दिवसांपासून ही सेवा पूर्ववत झाल्याने प्रवासी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक पास, व दैनिक पास या योजनेचा फायदा अनेक प्रवासी घेताना दिसत आहेत.
