
गणेश आठरे यांचा ‘सारथी’ कडून गौरव
दै.चालु वार्ता, प्रतिनिधी पुणे-
पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे यांचा नुकताच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, व्यवस्थापक संचालक समिर पांडे, सारथीचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्रीकांत देशमुख आदीं मान्यवरांच्या हस्ते आठरे यांना सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 2024-25 या वर्षात जिल्ह्यातून 5 हजार 266 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यामुळे राज्यभरात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच ‘सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजना’ या योजनेंतर्गत मागील वर्षभरात 629 विद्यार्थ्यांची नोंदणी करून जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला.
पुणे : ‘सारथी’च्या वतीने एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे यांचा सन्मान करताना अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, व्यवस्थापक संचालक समिर पांडे, सारथीचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्रीकांत देशमुख आदीं….